आजपासून रंगणार मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

Outdoor

Outdoor

जळगाव प्रतिनिधी | मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सागर पार्क मैदानावर ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मराठा प्रीमियर लीगच्या सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला थोर संतांची नावे देण्यात आली आहे. या स्पर्धेदरम्यान एकूण ४७ सामने खेळवले जातील. प्रत्येक सामना हा १० मर्यादित षटकांचा असेल प्रथम लीग पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने सामने होतील. या स्पर्धेचे ब्रँड अँबेसेटर सरकारी वकील उज्ज्वल निकम आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक हे पाटील बायोटेक प्रा.ली. आहे. स्पर्धा सकाळी ७ ते रात्री ११ वाजेदरम्यान सुरु राहणार असून अधिकाधिक नागरिकांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन असे करण्यात आले आहे. या वेळी पत्रकार परिषदेला डॉ. राजेश पाटील, प्राचार्य आर.व्ही. पाटील, श्रीराम पाटील, गोपाळ दर्जी, किरण बच्छाव, नीलेश कदम, प्रमोद पाटील उपस्थित होते.

स्पर्धेत संत सावता, संत नामदेव, संत कबीर, संत विसोबा, संत चांगदेव, संत तुकडोजी, संत गाडगेबाबा, संत गोरोबा, संत चोखामेळा, संत संताजी जगनाडे, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत चक्रधर, संत नरहरी, संत निवृत्तीनाथ, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत रविदास, संत सेना, संत दामाजी, संत ज्ञानदेव या संघांचा सहभाग आहे. स्पर्धेत ३४० खेळाडूंचा सहभाग आहे.

<p>Protected Content</p>