पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी येणारे महावीर जयंती, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद हे सण उत्सव शांततेत साजरे करण्यात यावेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून चुकीचे मॅसेज टाकुन युवकांनी समाज बांधवांची दिशाभूल न करता धार्मिक उत्सव हे गुण्यागोविंदाने साजरे करावे. कुठल्याही अफवा व भुलथापांना बळी न पडता अशा अफवा पसरविणाऱ्यांची नावे तात्काळ पोलिस प्रशासनास कळवावी. असे आवाहन तसेच सुचना पो.नि. राहुल खताळ यांनी केले.
पाचोरा पोलीस ठाण्याच्या आवारात सोमवारी ३ एप्रिल रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आयोजित हिंदु – मुस्लिम जातीय सलोखा निमित्त आयोजित बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, शेख रसुल शेख उस्मान, अब्दुल रशिद देशमुख, मुन्ना पिंजारी, मा. नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, रफीक बागवान, अजहर खान, दिपक माने, गणेश शिंदे, तुषार पाटील, शरद मोरे, प्रकाश चौधरी, अमोल जाधव, योगेश ठाकुर, रामा जठार, विरेंद्र चौधरी, मुक्तार बागवान, शिवश्री पाटील, संदिप चौधरी, दानिश देशमुख, वनराज चौधरी, भैय्या चौधरी, सचिन भोई, सचिन चौधरी, विशाल सोनवणे, योगेश महाजन, मयुर महाजन, किशोर चौधरी, साबिर शहा, राहुल लोणारी, जहांगीर अहमद, आनंद पगारे सह मोठ्या संख्येने हिंदु मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
आगामी काळात येणारे सण उत्सवात शहरातील शांतता अबाधित राहावी. तसेच समाज बांधवांमध्ये जातीय तेढ निर्माण न करता एकजुटी सण उत्सव साजरे करण्यात यावेत. यासाठी ३ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे सुत्रसंचलन पत्रकार संदिप महाजन यांनी केले. बैठकीत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी उपस्थितांना सण उत्सव साजरे करतांना घ्यावयाची काळजी या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शेख रसुल शेख उस्मान, अजहर खान, अब्दुल देशमुख, पत्रकार गणेश शिंदे, मिलिंद सोनवणे यांनी देखील सण उत्सव व मिरवणुकी प्रसंगी येणाऱ्या समस्यांबाबत पोलिस प्रशासनास माहिती दिली. याप्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे गोपनीय शाखेचे सुनिल पाटील, नितीन सुर्यवंशी, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, विनोद बेलदार, नरेंद्र नरवाडे, दिपक सुरवाडे, सचिन पवार, विश्वास देशमुख उपस्थित होते.