पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, अक्षय तृतीया हे सण उत्सव येत असुन या सण उत्सव काळात शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किमान महिनाभर शहर व तालुक्यातील अवैध तसेच परवानाधारक मद्याची दुकाने ही बंद ठेवण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालय व पाचोरा पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विशाल बागुल, पाचोरा तालुका महासचिव दिपक परदेशी उपस्थित होते. पाचोरा शहर व तालुक्यातील सर्व अवैध व परवानाधारक दारू दुकाने बंद ठेवण्यात यावी कारण, एप्रिल महिन्यात ६ एप्रिल रोजी श्रीराम यांचे परमभक्त अंजनी पुत्र पवनपुत्र हनुमान यांची जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे संविधान रचता भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव हा १४ एप्रिल नाही तर एप्रिल महिन्यात परवानगीनुसार केव्हाही साजरा केला जातो. १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही पाचोरा शहर किंवा तालुक्यात नाही तर अशा या महामानवाची जयंती ही विश्वभरात साजरी केली जाते आणि याच एप्रिल महिन्यामध्ये २२ एप्रिल रोजी मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात खुशीचा सण म्हणजे रमजान ईद आहे या रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधव हे रोजा म्हणजे निरंक उपवास ठेवतात याच रमजान महिन्यात मुस्लिम धर्मग्रंथ कुरान-ए-शरीफ हे आले आहे. म्हणून या महिन्याला पवित्र महिना मानला जातो. सदर एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यापासून ते शेवटच्या आठवड्यापर्यंत हिंदू मुस्लिम व आंबेडकरवादी सर्व जाती धर्माच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो यात काही आंबट शौकीन मद्य सेवन करणारे लोक हे मद्य सेवन करून उत्सवामध्ये धिंगाणा घालतात. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही म्हणून सदर एप्रिल महिन्यासाठी सर्व अवैध व परवानाधारक दारू दुकाने बंद ठेवण्यात यावे, कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन यास जबाबदार राहील. अशा आषयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तर्फे पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विशाल बागुल, पाचोरा तालुका महासचिव दिपक परदेशी उपस्थित होते.