आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मास विक्री बंद ठेवण्याचे मनपाचे एसपींना पत्र

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरातील मटन अथवा, बिफ मांस मार्केट , स्लॉटर हाऊस बंद ठेवावीत असे  मनपा सहाय्यक आयुक्त  अभिजित बाविस्कर यांनी  पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कळविले आहे.

 

जिल्ह्यात जैन धर्मियाचा पयुर्षण पर्वास २४ ऑगस्ट पर्वास प्रारंभ होत आहे, तर २६ ऑगस्ट रोजी बैल पोळा तर ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील सर्व मटन मार्केट, बीफ मांस विक्री व स्टॉटर हाऊस बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार दुकाने बंद ठेवावीत असे पत्र महापालिका सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर यांनी मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांना दिले आहे.

या सण उत्सवाच्या काळात बाहेरगावाहून मटन अथवा बिफ मांस शहराच्या हद्दीत कुणी आणणार नाही, अशी खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी तसेच कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र जळगाव शहरातील सर्व पोलीस स्टेशनला सुध्दा देण्यात आले आहे.

Protected Content