आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचे उद्यापासून जिल्हापरिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आगामी काळात होणार्‍या निवडणुकांच्या पाश्वभुमिवर पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी दि. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हापरिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

येणार्‍या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समीती, कृषी उत्पन्न बाजार समीती, शेतकरी सहकारी संघ व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकिच्या पाश्वभुमिवर शिवसेना पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा तालुक्यातील पाचही जिल्हापरिषद गटनिहाय मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, विधानसभा क्षेञप्रमुख अविनाश कुडे, तालुका प्रमुख सुनिल पाटील, यु. वि. सेना तालुका प्रमुख योगेश पाटील, माजी जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, माजी नगरसेवक डाॅ. भरत पाटील, माजी पंचायत समीती सभापती अणिल पाटील, पाचोरा नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी बाजार समिती संचालक पंढरी पाटील, पाचोरा शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडु चौधरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या जिल्हापरिषद गटनिहाय मेळाव्यांचा श्रीगणेशा दि. १ सप्टेंबर रोजी नगरदेवळा – बाळद गटाचा मेळावा चौधरी समाज मंगल कार्यालयात होणार आहे.

दि. २ सप्टेंबर रोजी पिंपळगाव – शिंदाड गटाचा मेळावा माळी समाज मंगल कार्यालय पिंपळगाव (हरे.) येथे होणार आहे. दि. ३ सप्टेंबर रोजी लोहटार – खडकदेवळा गटाचा मेळावा नाथ मंदिर, जारगाव येथे होणार असुन दि. ४ सप्टेंबर रोजी बांबरूड – कुरंगी गटाचा मेळावा नांद्रा येथे टेकडीवर घेण्यात येणार आहे.

तर दि. ६ सप्टेंबर रोजी लोहारा – कुर्‍हाड गटाचा मेळावा माळी समाज मंगल कार्यालय कुर्‍हाड येथे होणार असुन या मेळाव्यात सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनीधी यांनी उपस्थिती द्यावी असे अवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडु चौधरी यांनी केले आहे.

Protected Content