चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील वाघळी येथील पाचोबा शिवारात राहणाऱ्या आगग्रस्तांना आमदार मंगेश चव्हाण यांनी मदत देत आधार दिला.
वाघळी येथील पाचोबा शिवारात राहणाऱ्या भिल्ल बांधवांच्या झोपड्यांना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमाराच अचानक आग लागली होती. गणेश भिका मालचे यांचे ४७ हजार रूपयांचे, भिका सोमा मालचे यांचे ४० हजार रूपयांचे, चितांमण एकनाथ मालचे यांचे ५० हजार रूपयांचे, सुभाष भिका मालचे यांचे ४५ हजार रूपयांचे असे एकूण जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झाले. या आगीत घरातील ससांर उपयोगी वस्तु, धान्य, महत्वाची कागदपत्रे व किरकोळ रोख रक्कम जळून खाक झाली होती. आमदार चव्हाण यांनी तातडीने या चार कुटुंबांना छत उभारण्यासाठी आवश्यक लोखंडी पत्रे व लोखंडी अँगल वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य पोपट भोळे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, गिरीश बह्राटे, निवृत्ती कवडे, रणजित पाटीलउपस्थित होते.