पाचोरा, प्रतिनिधी । अखिल भारतीय मीणा समाज महासभा या संघटनेच्या खान्देश महिला अध्यक्षपदी सपना धनावत यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या आदेशानुसार महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात सपना धनावत यांची अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघटनेच्या खान्देश विभाग महिला अध्यक्षपदा वर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघठन मजबूत करण्यासाठी महिला नैतृत्वाचा अनुभव व मार्गदर्शनाचा सर्व जिल्ह्यातील मीणा समाजातील महिला नेतृत्वाचा योग्य उपयोग होईल व समाजात महिला सक्षमीकरणासाठी महिलांचा सहभाग व योगदान लाभेल. सपना धनावत यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सलावद, मीणा, प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ, सुभाष डोभाल, दिपक डोभाळ, गोपाल चन्नावत, दिनेश शिहरा, कैलास टाटू, दिनेश शिहरा, यांच्या उपस्थितीत शोभाबाई जोनवाल, संगीता कायटे, योगिता चेडवाळ, जयश्री शिहरा, निशा महेर, छायाबाई जोनवाळ, वर्षा कायटे यांनी अभिनंदन करुन सपना धनावत यांचा सत्कार करण्यात आला. निवडीबद्दल सर्वत्र समाज बांधवांसह परिसरात सपना धनावत यांचे अभिनंदन होत आहे.