जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मास्टर कॉलनीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणींचा बदनामीकारण फोटा टाकून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मास्टर कॉलनीत २१ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तरूणी सध्या शिक्षण करीत आहे. जामनेर शहरात राहणारा मोहम्मद आकीब शेख मोहम्मद रफीक रा. जुना बोदवड रोड, जामनेर, जळगाव याने १४ ऑगस्ट आिा १५ ऑगस्ट दरम्यान तरूणीच्या मोबाईल क्रमांकावर बदनामीकारक स्टेटस आणि व्हिडीओ पाठवून तिची बदनामी केल्याचा प्रकार घडला.
हा प्रकार तरूणी नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मोहम्मद आकीब शेख मोहम्मद रफीक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.