यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सीम येथे एकाने आक्षेपार्ह स्टेटस व्हॉटसॲपवर ठेवून व्हायरल केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात यावल पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले असून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथील गावातील पाण्याच्या टाकीवर दोन हिरवे कापडाचे झेंडे लावलेले होते. त्यानंतर एक भगवा झेंडा लावण्यात आला त्या दोन हिरव्या झेंड्यांच्या व्हाट्सअपवर फोटो घेऊन त्यावर लाल रंगाने क्रॉस करून व त्याचे खाली धार्मिक तेढ निर्माण होईल असे लिहिलेले स्टेटस ठेवले व हा फोटो गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वत:च्या मोबाईल क्रमांकावरून व्हायरल केले. त्यामुळे गावातील आदीवासी बांधवांच्या धार्मीक भवना दुखावल्याची घटना समोर आली. दरम्यान, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरीकडे फोटो व्हायरल झाल्यानंतर शेकडोंच्या संख्येने आदीवासी बांधव संशयित आरोपीच्या घरावर चालून येत असल्याची माहिती फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह तत्काळ हजर झाले आणि वातावरण निर्वाळले. याचा पुढील पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.