Home आरोग्य आईला कोरोनाची लागण ; मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

आईला कोरोनाची लागण ; मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

0
34

नाशिक (वृत्तसंस्थ) आईला कोरोनाची लागण झाली म्हणून नैराशात गेलेल्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी येथे घडली.

 

आईला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर तो तिला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. आईला पाहून घरी परतल्यानंतर मुलाने नैराश्येपोटी घरात गळफास आत्महत्या केली. नाशिक शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ६१५ जणांना करोनाची बाधा झाली तर सहा जणांनाही बळी गेला आहे. नाशिक मनपा क्षेत्रात ४०७ रुग्ण असून महानगरातील ५ जणांसह ग्रामीणमधील एक अशा ६ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३७१ वर पोहोचली आहे.


Protected Content

Play sound