आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत खेळाडू योगेश साळुंखेला रौप्यपदक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या सिव्हील विभागातील तृतीय वर्षाच्या योगेश मनोहर साळुंखे या विद्यार्थ्याने आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत “रौप्यपदक” पटकावले.

 

पंजाब विद्यापीठ, चंदीगढ येथे राष्ट्रीय अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल संघाने सहभाग नोंदविला होता. या संघातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या सिव्हील विभागातील तृतीय वर्षाच्या योगेश मनोहर साळुंखे या विद्यार्थ्याने आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत “रौप्यपदक” पटकावले.

 

विद्यापीठाच्या व रायसोनी महाविद्यालयाच्या या यशात राष्ट्रीय खेळाडू योगेश साळुंखे याने जोरदार क्षेत्ररक्षण केले. सदर स्पर्धेचे संघ प्रशिक्षक जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे क्रीडा संचालक प्रा. जयंत जाधव हे होते. स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, उपसंचालक व अॅकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Protected Content