नवी दिल्ली । राष्ट्रीय लॉकडाऊनच्या कालावधीत अर्थात १४ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद राहणार असल्याचे केंद्र सरकारने आज स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय विमान सेवा ही आधीच बंद करण्यात आली होती. मात्र ही वाहतूक नेमकी कधीपर्यंत बंद राहणार याबाबत माहिती देण्यात आलेली नव्हती. या पार्श्वभूमिवर, आज केंद्र सरकारने आंतराष्ट्रीय हवाई प्रवास हा लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होईपर्यंत म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अथार्त, १४ एप्रिलपर्यंत देशातील कोणत्याही विमानतळावर विदेशी विमान येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.