पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व जगामध्ये ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजेच महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठीचा व त्यांना हक्क व अधिकार बहाल केल्याचा ऐतिहासिक वारसा असलेला हा दिवस आहे ८ मार्च हाच का आंतरराष्ट्रीय महिला दिन ? असा प्रश्न पडतो तेव्हा त्याचे उत्तर असे आहे की, ८ मार्च या दिनाला विशेष ऐतिहासिक संदर्भ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला नव्हता त्यासाठी अमेरिका व युरोप खंडात स्त्रिया त्यांच्या परीने लढे तथा छोटी मोठी आंदोलने उभारून या असमानतेच्या तत्त्वाविरुद्ध लढा देत होत्या मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवत नव्हता मात्र सन – १९९० मध्ये अमेरिकेत ‘द नॅशनल अमेरिकन सप्रेजिस्ट असोसिएशनची’ स्थापना करण्यात आली अमेरिकेतील गौरवर्णीय महिलांच्या मताधिकारासाठी या संघटनेने प्रयत्न केले मात्र या संघटनेला वर्णद्वेष व स्थलांतरिता विषयी अनास्था असल्यामुळे या संघटनेला आवश्यक तेवढे यश प्राप्त होऊ शकले नाही. १९०७ मध्ये स्टूटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली होती त्यात क्लारा झेटकिन या महिलेने मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष घडवून आणणे हे समाजवादी महिलांचे कर्तव्य आहे अशी अपेक्षा व्यक्त केली होती ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील रूटगर्स चौकामध्ये कापड उद्योगातील हजारो स्त्रियांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निदर्शने केली या आंदोलनाच्या प्रमुख दोन मागण्या होत्या. एका दिवसाला कामाचे तास १० असावे, कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता प्राप्त व्हावी या मागण्यांसोबतच आणखी एक महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे रंग( वर्ण ), लिंग, मालमत्ता व शैक्षणिक पात्रता याचा विचार न करता सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक स्वरूपाच्या कार्याने क्लारा झेटकीन प्रभावित झाल्या होत्या सन – १९१० साली ‘कोपहेगन’ येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील वस्त्र उद्योगातील महिला कामगारांनी पार पाडलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे सदैव स्मरण राहावे म्हणून ८ मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा महत्त्वपूर्ण ठराव कलारा झेटकिन यांनी मांडला व हा ठराव पारित झाला. तेव्हापासून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो यानंतर अमेरिका व इंग्लंड मध्ये मतदानाचे अधिकारासाठी लढे उभारले गेले त्याचाच परिणाम म्हणून इंग्लंडमध्ये १९१८ तर अमेरिकेत १९१९ मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला भारतात पहिल्यांदा ८ मार्च १९४३ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला तसेच ८ मार्च १९७१ रोजी पुण्यात भला मोठा मोर्चा काढण्यात आला होता युनोने १९७५ हे जागतिक महिला वर्ष तर १९७५ ते १९८५ हे जागतिक महिला दशक म्हणून घोषित केले होते. आज जगात सर्वत्र ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होताना दिसतो. बल्गेरिया व रोमानिया या देशांमध्ये या दिनाला ‘मातृदिनही’ संबोधतात. तसेच इटलीमध्ये पुरुष स्त्रियांना पिवळ्या रंगाची फुले देऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात भारतात मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिन हा स्त्रियांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांच्या ऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून साजरा केला जातो.