चोपडा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील चित्रकार अनिलराज पाटील यांच्या चित्राची आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शन संकट मोचन या थीमवर आधारित दुबई येथील ऑनलाइन प्रदर्शनसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत जगभरातील नामवंत कलाकारांच्या चित्राची निवड झालेली आहे.
अनिलराज पाटील यांची गेल्या चार महिन्यात सलग चौथ्यांदा त्यांच्या विविध कलाविष्काराची निवड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी झाली. त्यात हार्मनी इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन , ऑल इंडिया लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर स्मृति चित्रप्रदर्शन , रेनबो आर्ट वर्ल्ड दिल्ली द्वारा आयोजित मेटॅफर या जगविख्यात संस्थांच्या प्रदर्शनात निवड झालेली आहे. आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शन स्पर्धेत त्यांनी पूर्णाकृती श्री महाबली हनुमान या बलबुद्धी देवताचे हुबेहूब चित्र स्टीपलींग आर्टस् शैलीत निर्माण केले आहे. प्रभू श्री रामचंद्रांना अनन्य भक्तिभावाने शरण जाऊन त्यांची सेवा करणारे पवनपुत्र श्री हनुमंताच्या चित्रासाठी खालील चौपाई वर आधारित चित्र साकारले आहे.
भीम रूप धरि असुर संहारे । रामचंद्र के काज संवारे ।।
लाय सजीवन लखन जियाये l श्रीरघुबीर हरषि उर
लाये ।।
या धवल यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून व राज्य कला अकादमीचे कलाकारांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.