Home Cities अमळनेर अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये शहीदांना अभिवादन

अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये शहीदांना अभिवादन


अमळनेर (प्रतिनिधी) येथील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे शहीद दिनानिमित्त शाहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेला प्राचार्य विकास चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

23 मार्च 1931 रोजी भगतसिंग,राजगुरु आणि सुखदेव या तिघ क्रांतिकारकांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी फाशी देण्यात आली होती. हे क्रांतीकारक देशासाठी हसत हसत फासावर चढले होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ह्या तिघही क्रांतिकारकांचे मोठे योगदान आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी शहीद दिनानिमित्त शाळेत ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound