अहमदाबादमध्ये परप्रांतीय मजुरांचा पुन्हा उद्रेक ; पोलिसांवर दगडफेक

अहमदाबाद (वृत्तसंस्था) अहमदाबादमध्ये घरी जाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या १०० परप्रांतीय कामगारांनी पोलिस आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याआधीही सूरत, वडोदरा शहरात कामगारांनी पोलिसांवर हल्ला व दगडफेक केल्याची घटना घडलेल्या आहेत.

 

 

या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जमखी झाले असून जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या व लाठीचार्जचा वापर करावा लागला. रस्त्यावर आलेल्या मजुरांना ज्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरच दगडफेक केली. वस्त्रापूर भागात दोन पोलिसांच्या गाड्या, कन्स्ट्रक्शन साईट, एक खासगी कार्यालयाची कामगारांनी तोडफोड केली. लॉकडाऊनमुळे दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेल्या मजूरांना घरी जाण्यासाठी केंद्राने रेल्वे विभागामार्फत श्रमिक एक्सप्रेस गाड्यांची सोय केली आहे. मात्र देशाच्या काही भागांत अजुनही मजूर व कामगार अडकून पडले आहेत. त्यामुळे गुजरातमधील परप्रांतीय मजुरांचा सातत्याने उद्रेक होताना पहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातमध्ये अडकून पडलेले कामगार घरी जाण्यासाठी रस्त्यावर येताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सूरत, अहमदाबाद शहरात परप्रांतीय कामगारांनी रस्त्यावर येत पोलिसांवर हल्ला केला होता.

 

 

Protected Content