जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे मंगळवारी २० सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे लोकार्पण सोहळा आणि मुक्ताईनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे आहे.
मंगळवार २० सप्टेंबर रोजी
दुपारी ३ वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण.
दुपारी ३.४५ वाजता- पाळधी येथे आगमन.
दुपारी ४ वाजता- पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा.
सायंकाळी ४.३० वाजता -पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण.
सायंकाळी ५.३० वाजता – मुक्ताईनगर येथे आगमन व जाहिर सभेस उपस्थिती.
रात्री सोईनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण
रात्री सोईनुसार जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथुन शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.