पुणे | एल्गार प्रकरणाचा तपासावरुन मतभेद निर्माण झाले असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून हा मुख्यमंत्र्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, या प्रकरणाचा तपास पुर्ण झाला असतानाही एनआयएने हा तपास हाती घेतला आहे. राज्यात भाजपची सत्ता असतानाच आता एनआयएने हस्तक्षेप करण्याची गरज काय असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.
हा प्रशासकिय निर्णय वाटत नसून त्याला राजकारणाचा वास येत आहे. ही खटकणारी गोष्ट आहे. राज्याच्या कामकाजात केंद्र हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. राज्या विरोधात केंद्र हे बरोबर वाटप नाही. मात्र, एनआयएकडे हा तपास देण्याचा मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचा अधिकार असून चर्चा करुनच त्यांनी निर्णय घेतला असेलही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मतभेद टाळून पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यकत केला.