अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करा

 

यावल, प्रतिनिधी तालुक्यातील न्हावी गाव परिसरात काल रात्रीच्या सुमारास वाळुची विना परवाना बेकाद्याशीर वाहतुक करणाऱ्या वाहनाचा प्रांत अधिकारी व पथक  आपल्या शासकीय वाहनाने पाठलाग करत असतांना प्रांत यांच्या वाहनास डंपरने धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ यावल तहसील कार्यालयात काम बंद आंदोलन करत दोषींवर एमपीडीएअंतर्गत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महसूल संघटनांनी केली आहे. 

वाळुची बेकाद्याशीर वाहतुक करणाऱ्या डंपर वाहनाने धडक देवुन कर्तव्य बजावणारे प्रांत कैलास कडलग आणि शासकीय वाहन चालक उमेश तळेकर यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी आज यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. या खळबळजनक व दबंगगीरीच्या घटनेस जबाबदार दोषींना एमपीडीएअंतर्गत तात्काळ कारवाई  व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सर्व फैजपुर विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महसुल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना  व चतृर्थ कर्मचारी संघटना यांनी आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील न्हावी गाव परिसरात काल दिनांक २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या शासकीय वाहना क्रमांक एमएच १९ एम ०७०८ हिने जात असतांना डंपर वाहनासह एक एक्सयुव्ही वाहन क्रमांक एमएच १९ बिएल१०१० ही वाहन त्यात ६ ते ७ आणि गाडी आरोपी महेन्द्र धनराज तायडे राहणार कोळन्हावी ता . यावल ही गाडी तालुक्यात फिरून अधिकारी यांची माहीती देणारे आणि अवैध वाळुची वाहतुक करून शासकीय कर्मचारी यांच्यावर ह्ल्ले करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे १० ते १२ अज्ञातांचा आणि हितसंबधीतांचा शोध घेवुन तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्याकडे करण्यात आली आहे.  याप्रसंगी यावल तहसीलदार महेश पवार, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील ,रावेरच्या नायब तहसीलदार देशमुख, के. पी. चौधरी यांच्या स्वाक्षरी आहे .

 

Protected Content