रावेर : प्रतिनिधी । महसूल विभाग एक्शन मोडवर असून आज एकाच दिवशी तिन अवैध वाळू वाहतूक करणा-या ट्रक्टर-ट्रॉलीचालकांवर धडाकेबाज कारवाई केली आहे.
ऐनपुरचे मंडळ अधिकारी शेलकर व खिरवड आणि थेरोळचे तलाठी , कोतवाल यांच्या पथकाने आज सकाळी विनापरवाना अवैध वाळु वाहतूक करतांना एमएच २८ टी ६६३५ व एमएच १९ सिझे ६६८७ क्रमांकाचे ट्रॅक्टर्स पातोंडी नजिक पकडून तहसील कार्यालयात जमा करून पंचनाम्यानंतर जप्त केले आहे. तिसरे अवैध वाळू वाहतूक करणारे टॅक्टर-ट्रॉली खानापुरनजिक पकडले असून त्यांच्या नंबर नेमका माहिती नसल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत होते