धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील आनोरे येथे अवैध दारू विक्री होत असून त्या संदर्भात धरणगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे धरणगाव पोलीस निरीक्षक पवन देसले यांना निवेदन देऊन त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी नाहीतर शिवसेना स्टाईल अदोलन करण्यात येईल असा इशारा धरणगाव चे माजी नगराध्यक्ष तथा महात्मा फुले बिग्रेड चे जिल्हा अध्यक्ष उषाताई वाघ यांनी दिला.
आनोरे येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे यामुळे दारू पिऊन घरातील माणसे घरात भांडण होत आहे. या भांडणांमुळे महिला वर्ग त्रस्त होत असल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहेत. यामुळेच आमचा संसारात बाधा निर्माण होत आहे तसेच या अवैध दारू मुळें तरुण वर्ग ही व्यसनाधीन होत आहे. महात्मा फुले ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष उषाताई गुलाबराव वाघ तसेच शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख कल्पना कापडणे यांचा नेतृत्वाखाली आनोरे येथिल महिला एकत्र येऊन पोलिस निरीक्षक देसले यांचा कडे दारूबंदी करा असा एल्गार पुकारत आंदोलनचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेविका अंजली विसावे, शहर प्रमुख रत्ना धनगर, भारती हेमंत चौधरी, हेमांगी अग्निहोत्री, सुनीता प्रल्हाद चौधरी, कांचन कापडणे, पुष्पा पाटील, छाया पाटील, मीना पाटील, सरला पाटील, सुरेखा पाटील, चंदनबाई पाटील, आशा पाटील, सरला महाजन, तिरोनाबाई पाटील, मंगलबाई पाटील, आशा समाधान पाटील, ममता महाजन , जिजाबाई कापडणे, भिकुबई महाजन, विजया पाटील, सुमित्रा पाटील, रेखा मोरे, सुनंदा पाटील, कल्पना महाजन, मिनाबाई भोई , विमल महाजन, या महिला निवेदन देण्यासाठी उपस्थित होत्या.