जळगाव प्रतिनिधी | जळगाववरुन ममुराबाद येथे मोटारसायकलवरून अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतूक करणार्या युवकाला तालुका पोलीसांनी मोटारसायकलीसह प्रजातप नगर येथून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ७ हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. या युवकाविरुध्द तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातून दररोज सुरेश मधुकर कोळी (वय ३४ रा. ममुराबाद) हा ममुराबाद येथे देशी-विदेशी दारुची वाहतूक करीत असल्याची माहिती तालुका पोलीसांना मिळाली होती. त्यानुषंगाने तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली वासु मराठे, सतिष हाळणोर, प्रितम पाटील, सुशिल पाटील, विजय दुसाने, महेंद्र सोनवणे यांनी सापळा रचून जळगाव- ममुराबाद दरम्यान प्रजापत नगरपासून काही अंतरावर सुरेश मधुकर कोळी याला एमएच १९ डीई ४०८० क्रमांकाच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ ७ हजार रुपयांची देशी-विदेशी दारु मिळून आली. तालुका पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून त्याला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. पोलीस कर्मचारी प्रितम पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात सुरेश मधुकर कोळी यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.