चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले.
चाळीसगाव शहरातून होणारी अवजड वाहतूक हा चिंतेचा विषय बनला आहे. शनिवारी रात्री आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वत: अवजड वाहने पकडून दिली होती. यानंतर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी एकत्र येऊन न्यायालयाच्या समोर रास्ता रोको आंदोलन केले.
टोला नाका चुकवण्यासाठी चाळीसगाव शहरातून अवजड वाहने हे सर्रास ये-जा करत असल्याने नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. यामुळे झालेल्या अपघातांमध्ये किमान दहा-बारा जणांचा जीव गेला आहे. यामुळे या समस्येचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. यात भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, भाजपचे जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे भीमराव खलाने, पंचायत समिती सभापती अजय पाटील, भाजपा शहर उपाध्यक्ष सोमसिंग राजपूत, नगरसेवक रामचंद्र जाधव नगरसेवक श्याम देशमुख ncp चे प्रमोद पांडुरंग पाटील, ncp युवक अध्यक्ष अमोल चौधरी.. नगरसेवक भास्कर पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष भावेश कोठावदे ..इंदिरा काँग्रेस चे कैलास नाना पाटील..नगर सेवक माना भाऊ राजपूत नगरसेवक सोमसिंग आबा राजपूत..तुषार चव्हाण सरचिटणीस योगेश खंडेलवाल, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सुबोध वाघमारे अरविंद गोत्रे रोहन पाटोल तुषार गोत्रे, सचिन आव्हाड, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरातील अवजड वाहतुकीविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांनी सदर रात्रीची वाहतूक बंद व्हावी यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असून उद्याच तात्काळ पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. शहराच्या महत्वाच्या प्रश्नासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन सर्वपक्षीय चाळीसगाववासीय एकत्र आल्याचे एक सकारात्मक चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
बायपास ची सुविधा असतानादेखील नियमांचे उल्लंघन करून चाळीसगाव शहरातून मोठमोठे अवजड वाहन रात्रभर होणारी वाहतूक यामुळे अनेक लोकांचे एक्सीडेंट मध्ये प्राण गेले आहेत आणि शहरातील रस्त्यांचीही नुकसान झाले आहे या अवजड वाहतुकीमुळे ठिकाणी खड्डे पडतात त्यामुळेही एक्सीडेंट होतात सुसाट वेगाने वाहने हे शहरातून जातात कोणत्याही जाणाऱ्या सामान्य नागरिकाचा विचार हे वाहनधारक करत नाहीत म्हणून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व चाळीसगावकर व सर्वपक्षीय सर्वात मोठे आंदोलन होईल यात काही नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहील याची दखल लवकरात लवकर प्रशासन व पोलीस विभाग यांनी घ्यायची आहे घटनास्थळी तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी भेट दिली यांच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेण्यात आले
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1640719396075707/