अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल; पिके झाली जमीनदोस्त (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । कडक उन्हात गार वारा आल्यावर मोठे आल्हादायक वाटते. परंतु शनिवारी संध्याकाळी वादळी वारे सोबतच पिकांचा कर्दनकाळ ठरणारी गारपीट झाल्याने पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्‍यासह पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

गहू, हरभरा, तूर, तसेच अन्य भाजीपाल्याचे या अवकाळी पावसाने तर मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मका पिक हे शेतात जमीनदोस्त झालेले आहे या वादळी वारे सह गारपीटीने मोठे नुकसान केले आहे. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा, वाघुलखेडा, मोंढाळे आदी अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. तसेच मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने परिसरात वीज खंडित झाली होती. गावांमध्ये अवकाळीने शेतकऱ्‍यांची झोप उडाली. या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/155156279802869

 

Protected Content