जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत हे जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक आढावा बैठकीसाठी जळगाव येथे नुकतेच आले होते. यावेळी विश्रामगृहावर मुस्लिम समाजाच्या वतीने जळगाव जिल्हा मनियार बिरादरीच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन हाजी अराफात यांना विविध मागण्यांचे एक निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, साकळी येथील दंगलीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी. तसेच असलम पिंजारीची फिर्याद घेतली गेली नाहीय, ती त्वरित नोंदवून चौकशी करावी.पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर वर्षातून दोन वेळा घेण्यात यावे ,जळगावच्या लोकसंख्येच्या हिशोबाने शंभरच्या ऐवजी पाचशे लोकांना प्रशिक्षण देण्यात यावे व त्याची प्रसिद्धी दैनिक वर्तमानपत्रात करावी. जळगावातील उर्दू शाळेच्या पटसंख्येनुसार शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक सुद्धा करण्यात यावी. मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळ मार्फत समाजातील गरजू बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. महानगरपालिका जळगाव शहरातील उर्दू शाळा मनपाची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने शिक्षकांना ऐच्छिक बदली याठिकाणी पाठवीत असल्याने शिक्षक संख्या कमी होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना पुन्हा जळगाव मनपा मध्ये नियुक्त करण्यात यावे व रिक्त जागा त्वरित भरावे. अल्पभाषिक गावामध्ये उर्दू भाषेचे ज्ञान असलेल्या अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात यावी. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यातील अल्पसंख्याकांच्या विविध योजनांवर बजेटनुसार खर्च झालेला नाही तो त्वरित खर्च करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन फारुक शेख, ताहेर शेख, सलीम इनामदार, अनिस शाह, समीर शेख, सय्यद लियाकतअली ,फजल कासार ,सय्यद चांद, अल्ताफ शेख,रऊफ टेलर, आदीनी दिले. सदर निवेदनावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत यांनी दिले.