रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर चौघांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारातून पिडीत मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर तिने नाईलाजाने गोळ्या घेऊन गर्भपात केल्याचा देखील प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात चौघांसह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. २ जानेवारी २०२२ रोजी रवी छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल छपरीबंद आणि गौरव जावे चौघे रा. रावेर यांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत रावेर तालुक्यातील पाल येथील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचार केलेल्याचा व्हिडिओ देखील चौघांनी काढून घेतला. दरम्यान पिडीत स्वतःची सुटका केल्यानंतर देखील चौघांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अधून मधून बोलवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीता ही गर्भवती राहिली, तेव्हा तिने नाईलाजाने गोळ्या घेऊन गर्भपात केला. आलेली आपत्ती टाळण्यासाठी पीडीतेच्या वडिलांनी तिचे लग्न दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या संदर्भात पीडितेने रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवी छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल छपरीबंध, गौरव जावे, पूजा छपरीबंद आणि धीरज जावे सर्व रा. रावेर या सहा जणांविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.