शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ जामनेर यांच्या वतीने पाचोरा तालुक्यातील एका गावातील पीडितेवर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
पाचोरा तालुक्यातील एका गावातील मागासवर्गीय गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे गावातील तरुणांनी लैंगिक शोषण करून सामूहिक अत्याचार केला आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे. या घटनेचा महाराष्ट्रातील चर्मकार समाज बांधव निषेध करीत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोर्टातील कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी. सदरचे केस फास्ट कोर्टद्वारे चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व पीडित गरीब मागास कुटुंबास न्याय मिळावा . यामुळे मागासवर्गीय होणारे अत्याचार विषयी प्रश्न म्हणून गुन्हेगारीला आळा बसेल या आशयाचे निवेदन पिंपळगाव पोलीस स्टेशन,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांना देण्यात आले. माहितीस्तव निवेदन प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांना पाठवण्यात आले आहेत. यावेळी जामनेर तालुकाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ डॉ.जितेंद्र वानखेडे, संत रोहिदास प्रतिष्ठान अध्यक्ष अशोक भारुडे , रामचंद्र दादा वानखेडे दिपक सुरळकर , संजय उंबरकर, पदमे साहेब, अॅड. सुरळकर, सुभाष वाडे, किशोर वानखेडे, विजु सुरळकर, चिंतामण लोखंडे, भुषण वानखेडे, प्रकाश वानखेडे, शांताराम दांडगे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ जामनेर पदाधिकारी उपस्थित होते.