अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – ग्रामस्थांची मागणी

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा गावकऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या गुन्ह्यातीत आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात केली आहे.

 

यावल तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन व एका तरूणाने सामूहिकरीत्या अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे. या घटनेतील आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले. यातील तिसऱ्या आरोपीस पोलीस कोठडीत टाकण्यात आले आहे. या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी ग्रामस्थ व विविध ठिकाणाहून आलेल्या तरूणांनी आरोपींना कठोर शिक्षा करा अशी मागणी केली आहे. यावेळी यावल येथील खरेदी विक्री संघात सांगवी खुर्दचे सरपंच आकाश धनगर, वढोदेचे सरपंच संदीप सोनवणे , रघुनाथ धनगर, सागर कोळी , जितेन्द्र कोळी, खेमचंद कोळी , नितिन कोळी यांच्यासह आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

Protected Content