Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा


विरार वृत्तसंस्था । वालीव हद्दीत एका १५ वर्षीय मुलीसोबत याच परिसरातील भंगारवाल्यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात वालीव पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

वालीव पोलीस ठाण्याअंतर्गत भोयदापाडा परिसरातील या अल्पवयीन मुलीवर याच परिसरात भंगारचे काम करणाऱ्या काही मुलांनी २०१९ पासून तिच्या घरातील आईवडील कामावर जात असल्याने घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. सदरची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. या संदर्भात सध्या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


Protected Content

Play sound