भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणार्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता मुलगी घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तीला आमीष व फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. परिसरात शोधाशोध केली असतांना मुलगी मिळाली नाही. वडीलांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पांडूरंग सोनवणे करीत आहे.