Home Uncategorized अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; रामानंदनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; रामानंदनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिचा कुठेही शोध लागला नाही. अखेर मंगळवारी २१ मार्च रोजी नातेवाईकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करीत आहे.


Protected Content

Play sound