अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी १४ मार्च रोजी मारवड पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
मारवड पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. आईवडील शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ मार्च रोजी रात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार ४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आला. मुलीच्या नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.