Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात सोमवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घरातील कुटुंबासोबत अल्पवयीन मुलगी झोपली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळून नेले. हा प्रकार पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू पीडित मुलगी ही कुठेही मिळून आल्याने अखेर सोमवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.


Protected Content

Play sound