जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यामधील कुसुंबा गावातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी रविवारी ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना गावात राहणारा पवन संतोष पाटील यांनी तिला काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु तिचा कुठेही शोध लागला नाही. अखेर रविवार ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पवन पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी पवन संतोष पाटील यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.