जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुलगी ही शाळेत गेलेली असताना अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण करून पळवून नेल्याचे समोर आले आहे. दरम्यान तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते कुठेही मिळून आल्याने अखेर सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आणि शेख करीत आहे.