Home आरोग्य अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्घुण हत्या !

अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्घुण हत्या !


रायगड (वृत्तसंस्था) एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील तांबडी येथे घडली आहे.

 

रविवारी (26 जुलै) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास मृत तरुणी शेतात काम करणाऱ्या आजोबांना आणण्यासाठी गेली होती. मात्र ८ वाजून गेल्यानंतरही ती घरी न आल्याने आई, वडील आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. यावेळी शेतावर जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना स्कूटी उभी असलेली दिली. मात्र ती मुलगी दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी आजूबाजूला शोध घेतला असता, वोवाळ्याच्या कोडं या ओहळ्याच्या मध्यभागी एका मोठ्या दगडावर मुलगी विवस्त्र आणि मृत असल्याचे आढळले. यानंतर लगेचच कुटुंबियांनी रोहा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या गावातील संशयितांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी एका आरोपीने गुन्हा केल्याची कबूली दिली.


Protected Content

Play sound