जळगाव : प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व अटक केलेल्या अक्षय गाविंदा चोपडे आणि ऋषीकेश नारायण कोळी ( रा. मालदाभाडी ता. जामनेर ) या दोघांचा जामिन अर्ज जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.
जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील अल्पवयीन मुलीला गावातील अक्षय चोडे आणि ऋषीकेश कोळी हे मुलीशी गप्पा गोष्टी करून तिचे नाव घेत होते. तसेच तिला चिडवून त्रास देत होते. सदरील मुलीन तिच्या हस्ताक्षरात शाळेच्या वहीत मजकूर लिहून ८ फेब्रुवारी रोजी अत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिडीत मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचदिवशी दोघांना जामनेर पोलीसांनी अटक केली. पिडीतेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले असल्यामुळे आज जिल्हा सत्र न्यायालयात जामिन अर्ज सादर केला असता न्या. आर.जे.कटारिया यांनी जामिन अर्ज नामंजूर केला आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील सुरेद्र काबरा यांनी काम पाहिले.