जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पहुर येथे राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दोन जणांकडून असलेल्या विनयभंग केला तर बदनामी करून वडीलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर गावातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्य आहे. गावात राहणारे ऋषिकेश गोपाल लोहार आणि हरी युवराज गोरे हे दोन जण पिडीत मुलगी हिचा २ मे पासून पाठलाग करत आहे. तसेच या दोघांनी तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असेल अश्लील चाळे करून विनयभंग केला. आणि तुझी बदनामी करेल व तुझ्या वडिलांना जीवे ठार मारेल अशी देखील धमकी दिली. हा प्रकार पीडित मुलीने अखेर घरच्यांना सांगितला, त्यानुसार पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी पहूर पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी ऋषिकेश गोपाल लोहार आणि हरी युवराज गोरे या दोघांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.