जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा परिसरातील सतरा वर्षीय अल्पवयीन फुस लावून पळवून नेत अत्याचार प्रकरणी महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी पीडित मुलीच्या आईवडीलांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांच्याकडे केली.
जळगाव शहरातील तांबापूरा भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपी विशाल भोई रा. जळगाव याने फुस लावून पळवून नेले होते. दुसऱ्या दिवशी २० जुलै २०२० रोजी जळगावातील मेहरूण तलावात बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात संशयित आरोपी विशाल भोई याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
२० जुलै रोजी ४ डॉक्टरांच्या समितीने मुस्कान चे पोस्टमार्टम केले होते व त्या पोस्टमार्टम रिपोर्ट वरून सदर गुन्ह्यात कलम वाढवण्यात येतील असे चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांनी फिर्यादी व सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र १८ ऑगस्टपर्यंत सदर पीएम रिपोर्ट हा शासकीय रुग्णालय जळगाव येथे धूळ खात पडलेला आहे. परंतु चौकशी अधिकाऱ्यांनी तो ताब्यात घेतलेला नाही. डॉक्टरांनी वारंवार फोन करून सुद्धा सदर अहवाल पोलिसांनी घेऊन न गेल्याने पिडीत मुलीला न्याय मिळत नाही.
महिला अधिकारीची चौकशी अधीकारी म्हणून नियुक्ती करा
आज १८ ऑगस्ट रोजी पिडीतेची आई, वडील, मामा, मावशी यांच्यासह मानियार बिरादरीचे फारूख शेख यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी भेट देवून या प्रकरणी महिला अधिकारीची नेमणूक करावी, पीएम रीपोर्ट तत्काळ द्यावा, अटक केलेल्या संशयित आरोपीस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आलेली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी त्वरित पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे लेखी आदेश दिलेले आहे.