मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यात सरकारने इंधनावरील कर वाढवल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर एक रुपयांनी वाढणार आहे.
आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारने कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. याशिवाय सरकारने इंधनावरील कर वाढवल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर एक रुपयांनी वाढणार आहे. राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी योजना, महिला सुरक्षा आणि कोरोना व्हायरसवर उपायांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला.