जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरातील कोरोनाने ग्रासलेल्या रूग्णाची नव्याने घेतलेली चाचणी निगेटीव्ह आली असल्याने हा रूग्ण आता रोगमुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील मेहरूण परिसरात वास्तव्यास असणारा एक इसम काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह म्हणून निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली होती. हा शहरातील पहिलाचा कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण होता. यामुळे मेहरूणसह परिसर सील करण्यात आला होता. दरम्यान, या रूग्णावल वैद्यकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर त्याची नव्याने चाचणी घेण्यात आली असती याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. यामुळे जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात कोरोनावर यशस्वी उपचार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००