जळगाव प्रतिनिधी। जिल्ह्यातील खाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या पाच व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधित रूग्णांची संख्या ६०० वर पोहोचली आहे.
खाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या पाच व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटे नगर, जुने जळगाव व मेहरूण रोड येथील तीन व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या ६०० झाली आहे.