चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा खुर्द शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतात विद्यूत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील ऊसाला भीषण आग लागली. या आगीत एकूण ११ एकर शेतातील ऊस जळून खाक झाल्याची घटना गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा खुर्द शिवारात शेतकरी गणेश पाटील आणि कमलबाई दामोदर पाटील यांचे शेत आहे. दोघांच्या शेतात उसाची लागवड करण्यात आलेली आहे. गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतातील गेलेल्या विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे अचानकपणे उसाला आग लागले. या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आहेत, दोन शेतकऱ्यांच्या शेतातील एकूण ११ एकर ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकरी गणेश पाटील यांचे ७ एकर तर दुसरे शेतकरी कमलबाई दामोदर पाटील यांचे ४ एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग योजनेसाठी अथक परिश्रम घेतले. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा एकूण ११ एकर शेतातील ऊस जळून खाक झाल्याचे समोर आले.