मुंबई (वृत्तसंस्था) राम मंदिराच्या आधीदेखील त्याठिकाणी बौद्ध विहार होते. त्याचे अवशेष देखील मिळाले आहेत. त्यामुळे भव्य बौद्ध विहार करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी अयोध्येत तीस एकर जागा खरेदी करणार असून बौद्ध विहार बांधणार आहे, अशी माहिती खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे.
आठवले पुढे म्हणाले की, बौद्ध विहारसाठी लवकरच एका ट्रस्टची स्थापना करणार आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून जमीन खरेदी करण्यात येईल. येत्या काळात अयोध्येत राम मंदिरासोबतच़ बौद्ध विहार देखील अयोध्येत येणाऱ्या भाविकांना पाहिला मिळणार आहे. अयोध्येत राम मंदीर होत आहे. मशिद देखील व्हायला हवी आणि बौद्ध विहार देखील व्हायला हवे. यासाठी मी स्वतः लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. तसेच लवकरच एका ट्रस्टची स्थापना करणार आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून जमीन खरेदी करण्यात येईल. येत्या काळात अयोध्येत राम मंदिरासोबतच़ बौद्ध विहार देखील अयोध्येत येणाऱ्या भाविकांना पाहिला मिळणार असेही आठवले म्हणाले.