नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्या प्रकरणी स्थगित करण्यात आलेली सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर सुरू होणार आहे.
यापूर्वी ६ जानेवारी रोजी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठ तयार करण्यात येईल असे सांगितले होते. या अनुषंगाने पाच न्यायमूर्तींचा समावेश असणारे पीठ तयार करण्यात आले आहे. या पीठाच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश रंजन गोगोई तर अन्य न्यायाधीशांमध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. वी. रमन्ना, न्या. यु. यु.लळीत आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. हे खंडपीठ आता इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहे.