अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार : २४ तासांत ४,५९१ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) बुधवार रात्री ८ ते गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत या २४ तासांत अमेरिकेत ४,५९१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अमेरिकेत विक्रमी मृत्यू झाले आहेत. येथे २४ तासांत कोरोनामुळे तब्बल ४,४९१ जणांचा मृत्यू झाला आसून मृतांचा आकडा गुरुवारी ३२,९१७ वर पोहोचला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. मात्र, अमेरिकेत गुरुवारी २,२५७ जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला, असे सीएनएनने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ओपनिंग अप अमेरिका अगेन’ य नावाने एक प्लॅनदेखील तयार केला आहे. यात तीन टप्प्यांमध्ये शाळा, कार्यालये आणि कंपन्या पुन्हा सुरू केल्या जातील, असे म्हटले आहे. मात्र, असे असले तरी न्यू यॉर्कने गुरुवारीच लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Protected Content