बीजिंग : वृत्तसंस्था । कोविड उत्पत्तीच्या तपासणीबद्दल हा विषाणू चीनी प्रयोगशाळेतून गळती झाल्याच्या सिद्धांताचा डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी पुर्नविचार करण्याच्या वक्तव्यामुळे व चीनकडून अपूर्ण माहिती मिळाल्याच्या अमेरिकेच्या दाव्यामुळे चीन पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी डब्ल्यूएचओ आणि चीनी तज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात कोविड -१९ च्या विषाणूच्या प्रसारामागे वेगळाच प्राणी असल्याची नोंद केली होती. ज्यामुळे वटवाघूळांपासून मनुष्याकडे हा विषाणू पसरला. असेही मत व्यक्त होत होते
चीनच्या मध्यवर्ती शहर वुहानमधील व्हायरलॉजीच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू प्रथम उद्भवला आणि या विषाणूमुळे कोविड -१९ हा साथीचा रोग निर्माण झाला असावा या सिद्धांतास चीनने ठामपणे नकार दर्शविला असल्याचे या अहवालात सुरुवातीला म्हटले आहे.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेबेरयसियस यांनी विषाणूची उत्पत्ती प्रयोगशाळेतील झाली असल्याच्या शक्यतेचा पुर्नविचार करण्याचे वक्तव्य केले, कारण जानेवारीत वुहानच्या दौऱ्यात चीनने तज्ञांना प्रवेश न देण्यासाठी कारणे दिली होती. त्यांनी भविष्यातील चौकशीमध्ये “वेळेवर आणि सर्वसमावेशक डेटा सामायिकरण” करण्याची मागणी केली.