मुंबई प्रतिनिधी । प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावरून भाजप नेत्यांनी टिकेचा सुर लावला असतांना मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी मात्र त्यांना शुभेच्छा देऊन उमदेपणा दाखवून दिला आहे.
कालच प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाचा श्रीगणेशा झाला. त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे काँग्रेसी उत्साही झाले असून भाजपने मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहूल गांधी फेल झाल्यानेच प्रियंकांना राजकारणात उतरावे लागल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र प्रियंका यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचं स्वागत आहे असं त्या म्हटल्या आहेत. त्यांनी प्रियंका गांधींना शुभेच्छाही दिल्या आहेत. राजकारणातील विखारीपणाच्या पार्श्वभूमिवर अमृता फडणवीस यांचा उमदेपणा कौतुकाचा विषय बनला आहे.