अमृता फडणविसांना एक कोटीच्या लाचेची ऑफर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमृता फडणवीस यांना एक कोटी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मलबार हिल पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे.  त्यावरून पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १२० (बी) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदविली. आज इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त दिल्यानंतर याची माहिती समोर आली आहे.

 

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ‘१८ आणि १९ फेब्रुवारीला त्यांच्या परिचयाच्या अनिक्षा या फॅशन डिझायनरचे तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक संदेश अज्ञात फोन नंबरवरून पाठवले. यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत उल्लेख केलेल्या क्रमांकावर अनिक्षाच्या वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित क्रमांकावर अनेकदा कॉल केल्यानंतर तो कोणीही उचलला नाही.  यामुळे ती तिच्या वडिलांसोबत, अप्रत्यक्षपणे माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी तक्रारीत केला असून यावरून दाखल गुन्ह्यात आरोपी म्हणून अनिक्षाच नाव असून, अनिक्षाच्या वडिलांचा सहआरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

Protected Content