नवी दिल्ली वृत्तसंस्था । “काँग्रेसने ७० वर्षात काय केले, असं विचारतच अमित शाह उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले,” असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज पुन्हा अचानक एम्समध्ये भरती करण्यात आलं आहे. शाह यांना ताप आला होता. त्याचबरोबर अंगदुखीचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शाह यांना एम्समध्ये भरती करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.
“पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोष देत १९५६ मध्ये बाळ नरेंद्र यांनी स्थापन केलेल्या दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं, असा ओरडून प्रश्न विचारतच अमित शाह हे उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती तातडीनं बरी व्हावी, अशी आम्ही प्रार्थना करतो,” असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.